आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्माष्टमी:शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री शिवाजी इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल येथे मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी शुक्रवार, दि. १९ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य संदीप ठाकरे यांनी केले.

या कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर रित्या राधा व श्रीकृष्णाची वेशभूषा परिधान केली होती. विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांच्या उस्फुर्त सहभागाबद्दल उपस्थित मान्यवरांनी, शिक्षकांनी व पालकांनी मुलांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संदीप ठाकरे, अनिता शिरभाते, पायल डकरे, बबिता केवदे, वैशाली कुथे, सपना नाईक, भारती भगडकर यांचे परिश्रम लाभले. कार्यक्रमाला पालकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...