आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्ताह:राळेगाव येथे श्रीमद भागवत कथा सप्ताह

राळेगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राळेगाव येथील पांडुरंग रुक्मिणी देवस्थानच्या वतीने मंदिराच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात श्रीमद भागवत कथा सप्ताह पार पडला. संभाजी नगर येथील हभप संदीप महाराज सांगळे यांनी सात दिवस भागवत केले. त्यांना धोंडूबा महाराज गरुड, लखन महाराज, आकाश महाराज लोखंडे, गोपाल महाराज मोरे, गणेश महाराज दरोडे, सागर महाराज नांदूरकर, शरद महाराज रेनगुळे, सागर महाराज ठोंबरे यांची साथ लाभली. याशिवाय सात दिवस दररोज काकड आरती, तसेच सायंकाळी हरिपाठ आणि भारुड हे कार्यक्रम होत होते.

शेवटच्या दिवशी गोपाल काल्याचे कीर्तन झाले. महाप्रसादाने भागवताची सांगता झाली. यावेळी मंदिराचे विश्वस्त रमेश सोनी यांनी मंदिरास पांडुरंग रुक्मिणी यांच्या मूर्तीवर शत्र भेट दिले. भागवत सप्ताहासाठी देवस्थानचे अध्यक्ष अॅड. प्रफुल्ल चौहान, उपाध्यक्ष पारस वर्मा, सोनाली काळे, सचिव राजेश काळे, सहसचिव रमेश सोनी, कोषाध्यक्ष संजय इंगळे, सदस्य प्रकाश मेहता, भूपेंद्र कारिया, जानराव गिरी, प्रदीप ठुने, पद्माकर ठाकरे, सुनंदा केंढे, उषा काळे यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...