आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:वित्त व लेखा, सहाय्यक लेखाधिकारी पदावर श्याम जाधव यांची पदोन्नती

दिग्रसएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उपकोषागार कार्यालय दिग्रस येथे कार्यरत असलेले उपकोषागार अधिकारी श्याम जाधव यांची महाराष्ट्र वित्त व लेखा सहाय्यक लेखाधिकारी गट-ब (राजपत्रित) या पदावर बुलडाणा येथे पदोन्नती झाली आहे. संचालक लेखा व कोषागार वैभव राज घाटगे महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून यासंबंधीचे आदेश नुकतेच प्राप्त झाले.

कोरोना काळात दिग्रस येथील खाजगी कोविड रुग्णालयांचे ऑडिट करण्याचे काम उपकोषागार विभागाचे अधिकारी श्याम जाधव यांचेकडे देऊन खाजगी कोविड रुग्णालयाचे प्रशासक म्हणून त्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी यांनी केली होती. त्यामुळे सामान्य नागरिकांचा कोषागार विभागाशी संपर्क झाला. उपकोषागार अधिकारी श्याम जाधव यांनी कोरोना काळात खाजगी कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून अतिरिक्त व जास्त शुक्ल घेणाऱ्या रुग्णालयांचे ऑडिट करून दंड ठोठावण्यात महत्वाची भूमिका निभावली.

बातम्या आणखी आहेत...