आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागावालगत असलेल्या शेतात अस्वलाचे दर्शन झाले. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने अस्वलाला पकडण्यासाठी केलेले प्रयत्न पूर्णत: निष्फळ ठरले आहेत.
काळी (दौ.) वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येत असलेल्या हिवरा (संगम) शिवारात शुक्रवारी सकाळी गावालगतच्या शेतामध्ये अस्वल निदर्शनास आले. तद्नंतर शेतकऱ्यांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली. त्यावरून अस्वलाला पकडण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कुरोडे, वनपाल संतोष बदकुले, वनरक्षक मुसळे, यांच्यासह रेस्क्यू टीमने आटोकाट प्रयत्न केले, परंतु शेतामध्ये असलेल्या पिकांमुळे अस्वलाला पकडण्यास मोठी अडचण आली.
अखेर वन विभागाच्या पथकाला रिकाम्या हाती परत जावे लागले. वारंवार अस्वल परिसरात दिसत असल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये भिती निर्माण झाली आहे. सद्या रब्बी हंगाम सुरू असून, पिकाला रात्री बेरात्री पाणी द्यावे लागत आहे. रात्रीला अस्वलाच्या भितीपोटी शेतकरी शेतात जाण्यास धजावत नाही. पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे वन विभागाने तत्काळ अस्वलाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.