आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शहराच्या प्रमुख चौकातील सिग्नल पुन्हा सुरू होणार; 18 लाख खर्चून नवे सिग्नल, बसस्थानक, एलआयसी चौकात कामाची सुरूवात

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रमुख चौकात असलेले मात्र गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत पडलेले ट्राफिक सिग्नल बदलुन त्याजागी नवे सिग्नल लावण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे प्रमुख चौकातील सिग्नलचे दिवे पुन्हा सुरू होणार असुन बेशिस्त वाहतुकीला काही प्रमाणात आळा बसणार आहे. त्यासाठी पालिकेच्या वतीने १८ लक्ष रुपयांचा खर्च करण्यात येत आहे.

शहरातील प्रमुख मार्गावरुन होणारी वाहतुक शिस्तीत व्हावी यासाठी चौका-चौकात लावण्यात आलेले ट्राफिक कंट्रोल सिग्नल महत्वाची भुमीका बजावत असतात. मात्र शहरातील चौकात असलेले सिग्नल गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत पडलेले होते. त्यामुळे बसस्थानक चौक, एलआसी चौक, स्टेट बँक चौक यासारख्या इतर महत्वाच्या चौकांमध्ये नेहमीच वाहतुकीचा खोळंबा झालेला दिसुन येत होता. त्यामुळे शहरातील सिग्नल पुन्हा सुरू करण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती.

दरम्यान काही दिवसांपुर्वी पार पडलेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीतही हा विषय चर्चेला आला. त्यावरुन जिल्हाधिकारी यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाला शहरातील सर्व रस्त्यांची तपासणी करुन शहरातील आवश्यक असलेल्या प्रमुख चौकांमध्ये सिग्नल तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी दिलेल्या अहवालावरून शहरातील बसस्थानक चौक आणि एलआयसी चौक या दोन चौकांमध्ये सिग्नल लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

पालिकेच्या वतीने करण्यात येत असलेले हे काम पुणे येथील जे पी ट्राफिक ऑटोमेशन या कंपनीला देण्यात आले आहे. या कामासाठी नगर पालिकेच्या निधीतून १८ लक्ष रुपयांच्या निधीची तरतुद करण्यात आली होती. त्यात बसस्थानक चौक आणि एलआयसी चौक येथे नवे सिग्नल लावुन ते कार्यान्वित करण्याचे काम होणार आहे. सीग्नल चालु झाल्यानंतर या चौकांमध्ये होणारा वाहतुकीचा खोळंबा दुर होवुन वाहतुक सुरळीत सुरू राहील आणि वाहतुक कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होइल असेही सांगण्यात आले आहे.

चार ठिकाणी सिग्नलचे काम विचाराधीन
सध्या दोन चौकांमध्ये ट्राफिक सिग्नल लावण्यात येत आहेत. हे काम पुर्ण झाल्यानंतर आर्णी मार्गावरील बीरसा-मुंडा चौक, स्टेट बँक चौक, शारदा चौक आणि कॉटन मार्केट चौक या चार ठिकाणी सिग्नल लावण्याचे काम विचाराधीन आहे. त्यासाठी निधी सध्या उपलब्ध नसल्याने निधी उपलब्ध झाल्यास पुढील कामे टप्प्या-टप्प्याने करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...