आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाप्रसाद:श्री एकवीरा मातेचे चांदीचे सिंहासन समर्पण सोहळा ; विविध कार्यक्रमासह महाप्रसादाचे आयोजन

महागाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अष्ठादश शक्तिपीठांपैकी आठवे शक्ती पीठ असलेल्या श्री एकवीरा मातेला चांदीचे सिंहासन बसविण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महागाव तालुक्यातील हिवरा (संगम)येथील श्री एकवीरा देवी संस्थान येथे महेश नवमीच्या पावन मुहूर्तावर गुरूवार, दि. ९ जून रोजी श्री एकवीरा मातेला चांदीचे सिंहासन समर्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सकाळी ८ वाजता समर्पण पुजा विधीला सुरुवात होणार असून, त्यानंतर सकाळी ११ वाजता महाआरती, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याच सोहळ्याचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री एकवीरा देवी संस्थानचे विश्वस्त मंडळ, गावकऱ्यांनी केले आहे. श्री एकवीरा मातेला चांदीचे सिंहासन बसवण्याचा मानस विश्वस्त मंडळाने व्यक्त केला. तद्नंतर भाविकांनी त्यासाठी आपली देणगी देवुन तो पूर्णत्वास नेला आहे. मातेचे सिंहासन अंदाजे २५ ते ३० किलो वजनाचे आहे. यासाठी अंदाजे ३१ लाख रुपयांपर्यंत खर्च करण्यात आला आहे. मातेचे सिंहासन अतिशय सुबक व मनोहारी आहे.

बातम्या आणखी आहेत...