आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकाऱ्यांना दिले निवेदन‎:साहेब, आमच्या गावची दारू बंद करा हो‎; हटवांजरी येथील रणरागिणी पोलिस स्टेशनवर धडकल्या

मारेगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील हटवांजरी येथील‎ अवैध दारू विक्री बंद करण्याच्या ‎प्रमुख मागणीसाठी येथील महिलांनी ‎मारेगाव पोलिस स्टेशनवर धडक‎ देऊन दारूबंदीची मागणी केली.‎ येत्या चार दिवसांत अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई न झाल्यास कुटुंबासह पोलिस स्टेशन समोर ‎उपोषणाचा इशाराही महिलांनी निवेदनातून दिला आहे.‎ गेल्या अनेक दिवसांपासून‎ हटवांजरी येथे छुप्या पद्धतीने‎ राजाराम घोडाम, अमोल कुडमेथे‎ तसेच बुरांडा येथील पवार हे तीन‎ व्यक्ती देशी दारू विक्री करत आहे.‎

यामुळे गावातील बालक, तरुण वर्ग‎ नशेच्या आहारी गेल्याने गावातील‎ शांतता भंग होत आहे. तसेच‎ कौटुंबिक वादही उद्भवत आहेत.‎ गावातील अनेक संसार उद्ध्वस्त‎ होण्याची वेळ आली आहे. यामुळे‎ येथील महिला सरपंच नीता कुमरे‎ यांच्या नेतृत्वात गावातील महिलांनी‎ थेट मारेगाव पोलिस स्टेशन गाठत‎ गावातील अवैध दारू विक्री बंद‎ करण्याची मागणी निवेदनातून केली.‎ येत्या चार दिवसांत अवैध दारू‎ विक्रेत्यांवर कारवाई न झाल्यास‎ पोलिस स्टेशनसमोर कुटुंबासह‎ उपोषण करण्याचा इशाराही दिला.‎ या वेळी हटवांजरीच्या सरपंच नीता‎ तुकाराम कुमरे, ताईबाई येवले, रेखा‎ शेंडे, लीला आत्राम, बेबी रामपुरे,‎ शांता आत्राम आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...