आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था:धनादेश अनादर प्रकरणी सहा महिण्याच्या कारावासाची शिक्षा

मारेगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री. रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीतमधून कर्ज उचल केली. मात्र, कर्जाची परतफेड न करता धनादेश देऊन तो अनादर झाला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले होते. त्यावर मारेगांव न्यायालयाने निकाल देत मार्डी येथील एका इसमाला सहा महिण्याचा कारावास आणि ५५ हजार रुपयांचा नुकसान भरपाईचा आदेश दिला आहे.

वामन जागोजी दुमने, रा. मार्डी ता. मारेगांव असे शिक्षा झालेल्या कर्जदाराचे नाव आहे. त्याने श्री. रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेतून कर्जाची उचल केली होती. मात्र, कर्जाची रक्कम न देता संस्थेला धनादेश दिला होता, परंतु त्याच्या खात्यात रक्कम नसल्यामुळे धनादेश अनादर झाला. त्यामुळे संस्था कर्मचारी आनंद गंगशेट्टीवार यांनी न्यायालयात धाव घेत प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. येथील न्यायदंडाधिकारी निलेश वासाडे यांनी युक्तिवाद ऐकुन आरोपी वामन जागोजी दुमने, रा. मार्डी यास धनादेश प्रकरणी दोषी ठरवुन सहा महिण्याची शिक्षा आणि ५५ हजार रुपये नुकसान भरपाईची रक्कम अदा आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...