आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहिहंडी:स्केटिंगच्या सिंथेटिक मॅट मैदानावर केली दहिहंडी

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खेळाडूंना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी गोधनी मार्गावरील जिल्हा क्रीडा संकुलात सुमारे ३० कोटी रुपये खर्च करुन अद्ययावत मैदाने तयार करण्यात आली आहेत. मात्र या मैदानांच्या देखभालीकडे क्रीडा विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यातच या संकुलात स्केटिंगचे अद्ययावत सिंथेटिक मॅटचे मैदान तयार करण्यात आले आहे.

मात्र शनिवार दि. २० ऑगस्ट रोजी सायंकाळी या मैदानावर चक्क दहीहंडीचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यासाठी मटकी आणि दहीहंडी असा तामझामही करण्यात आला होता. यासंदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी अशा कुठल्याही कार्यक्रमाला परवानगी दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता या गंभीर प्रकरणात काय कारवाई होणार याकडे लक्ष राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...