आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक बांधिलकी; नेरवासीयांचे श्रद्धास्थान गणपती मठाची १०५९ वर्षाची अखंड परंपरा

नेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील विविध भागात राहणाऱ्या नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या नेर शहरातील गणपती मठाला तब्बल १०५९ वर्षांची परंपरा लाभली आहे. या गणपती मठामध्ये गणेशोत्सव सातत्याने साजरा करण्यात येत असून या उत्सवादरम्यान धार्मीक कार्यक्रमांसोबतच विविध सामाजीक कार्यक्रम राबवून सामाजीक बांधीलकी जोपासण्याचे काम करण्यात येते.

नेर शहरात असलेले गणपती मठ संस्थान हे तालुक्याचे श्रद्धास्थान आहे. या गणपती मठाला एक हजार वर्षांपेक्षा अधिकचा वारसा लाभला आहे. पंचक्रेाशीत प्रसिध्द असलेले हे संस्थान इ.स. ९६३ साली स्थापन झाले असून या मठाला प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभला आहे. याला शक्ती पीठ, भक्ती पीठ, प्रेरणा स्थळ व नवसाला पावणारा गणपती म्हणुन ओळखल्या जाते. या गणपती मठाला आता तिर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा मिळाला आहे. या ठिकाणी गणेशोत्सवात पूर्ण १० दिवस सामाजिक प्रबोधनासह शैक्षणीक व आरोग्य विषयीचे अनेक उपक्रम विश्वस्त मंडळाच्या वतीने राबवले जातात. देशातल्या पाच पीठांपैकी एक पीठ असलेल्या उज्जैनी पिठाशी हा गणपती मठ संलग्न आहे. पाच पिठाचे पाच जगद्गुरु यातील एका जगदगुरुंनी या गणपती मठाची स्थापना केली होती. शंकराची उपासना करणारे शैवपंथीय जंगम लोक हे पूर्वी पासून येथे पुजारी आहे.

१०५९ वर्षाची परंपरा जपणाऱ्या या गणपती मठ संस्थानच्या वतीने यंदाही विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गणपती मठाचा गणपती जागृत असून नवसाला पावणारा गणपती असल्याची आख्यायिका आहे. शैव संस्कृतीचा वारसा जपणारा हा मठ आहे. परपंरागत चालत आलेली दशावतारी सोंगे यंदाही करण्यात येणार आहे. शेवटच्या दिवशी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमाच्या माध्यमातुन धार्मीक आणि सामाजीक भावना गणपती मठाकडून सातत्याने जपण्यात येत आहेत.

कोरोना काळात राबवले विविध उपक्रम
गेल्या दोन वर्षात कोरोना लसीकरण, रक्तदान शिबीर आणि विविध प्रकारच्या आरोग्य तपासणी घेण्यात आल्या. त्यासाठी वेळोवेळी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. गरजू विधार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यंदाच्या गणेशोत्सवात नेर येथील शासकीय रुग्णालयाच्या सौजन्याने कोरोना बूस्टर डोसचे लसीकरण व आरोग्य तपासणी यासाठी शिबिर घेतले.

बातम्या आणखी आहेत...