आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:सामाजिक कार्यकर्त्याला दिली जीवे मारण्याची धमकी ; पीओपी मूर्तींवर बंदीसाठी दिले होते निवेदन

यवतमाळ25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पीओपी मूर्तीवर बंदी घालण्यासाठी निवेदन देणाऱ्या एका सामाजीक कार्यकर्त्याला उमरखेड येथील एका युवकाने अश्लील भाषेत शिविगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी रात्री घडली असून गुरुवारी शेकडो कुंभार समाज बांधवांची शहर ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. संजय पळसकर रा. उमरखेड असे धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी प्राप्त माहितीनूसार, नागपूर उच्च न्यायालय खंडपीठाने दि. २७ फेब्रुवारी २०२० रोजी आणि फेरविचार याचिका निर्णय दि. २५ ऑगस्ट रोजी पीओपी बंदीचे आदेश राज्यात दिले. त्यावरून केंद्रिय प्रदुषण नियंत्रण बोर्ड दिल्ली यांनी दि. २८ मे २०२० रोजी या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सैवंधानीक मार्गाने जिल्हा कुंभार महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्याधिकाऱ्यांना दोन दिवसापूर्वी निवेदन दिले असून याबाबत वृत्तही प्रसारीत झाले होते. दरम्यान दुसऱ्या दिवशी रात्री उमरखेड येथील संजय पळसकर नामक युवकाने कुंभार समाज महासंघाचे जिल्हा युवा अध्यक्ष गंगाधर खंदारे यांना वॉट्सअॅपच्या माध्यमातून अश्लील शिविगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून जिल्हा कुंभार महासंघाने गुरुवारी शहर पोलिस ठाणे गाठून याबाबत तक्रार दाखल केली. यावेळी जिल्हाध्यक्ष राकेश प्रजापती, शंकर मोहबिया, सतीश ठाकरे, अॅड. श्रीकांत पाडवार, माधवराव मेहर यांच्यासह पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...