आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी मदतीच्या आशेवर:अतिवृष्टीने चाळीस हजार हेक्टरवरील सोयाबीन, कापूस पिकांचे झाले नुकसान

उमरखेड17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात अतिवृष्टीने व महापुराच्या तडाख्याने सोयाबीन व कापूस इतर पिकांचे नुकसान झाले. जवळपास ४० हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून ५२ कोटी रुपयाची तरतूद तालुक्यासाठी करण्यात आली असल्याची माहीती प्रशासनाने दिली आहे .जुलै व ऑगस्ट महीन्यात सतत संततधार पाऊस तीन - चार वेळा अतिवृष्टी व महापूर असे संकट शेतकऱ्यांच्या माथ्यावर आले. उमरखेड तालुक्यात सर्वत्र ठिकाणी अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. सोयाबीन व कापूस पिकांची नासाडी व अतोनात नुकसान झाले. तालुक्यात दि. १३ जुलै आणि दि. १४ जुलैला अतिवृष्टी व ढगफुटी सारखा पाऊस झाला. पैनगंगा नदी काठावरील पिकांचे नुकसान झाले.

सोयाबीन व कापूस पिके पाण्यात बुडाली. जुलै व ऑगस्ट महिन्यात पिके पाण्यात बुडाली. अंकुर जमीनीच्या बाहेर निघतात, महापुरांचा तडाखा पिकाना बसला जे पिके ऑगस्ट महीन्यात हातभर पिकांची वाढ होत होती. ती वाढ इतभर झाली. जुलै व ऑगस्ट महीने अतिपावसाने गेले सप्टेबर महिन्यात उष्णता उकाडा वाढला. पिकांची वाढ खुंटली, पिकांवर रोग आले. अश्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हैराण झाले. शेतीला कर्ज काढून शेतीचे व्यवस्थापन केले. पण अतिवृष्टी मुसळधार पाऊस महापूर, उष्णतेचा उकाडा आणि सप्टेबर महीन्यात अवेळी पाऊस असा उपद्रव पणा निसर्गाचा वाढत आहे. शासनाने सर्व्हे केले, पण अतिवृष्टीची नुकसान हजारो हेक्टर झाले.

शासनाने कागदावर चाळीस हजार हेक्टर नुकसान दाखविले. जे नदी नाल्या काठावरील शेतकऱ्यांचे संपूर्ण नुकसान झाले. शासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर न जाता सर्व्हे केला. सोयाबीन व कापूस पिकांची नासाडी चाळीस हजार हेक्टर दाखवली व नुकसान मदत तालुक्याला बावन कोटी मदतीचा तरतुद असल्याचे कळते. पण तटपुंज्या मदतीने शेतकऱ्याची भरपाई होत नाही कारण शेतकरी कर्जबाजारी आहे. कर्ज काढून बियाणे खते औषधी खरेदी केली. परंतू अतिवृष्टीने काही ठिकाणी जमिनी खरडून मातीसह गेल्या तर काही ठिकाणी पिकांची नासाडी झाली. पैनगंगा नदी काठावरील पिके पाण्यात बुडाली. शेतक-यांनी वारंवार निवेदन शासनाकडे दिले.

संततधार पावसामुळे राळेगाव तालुक्यात शेतकरी सुखावला राळेगाव तालुक्यात सप्टेंबर महिन्यातील परतीच्या संततधार पावसाचा फटका काहीच गावांना बसला असून नदी नाल्याला पूर आला असून दि. ११ सप्टेंबर रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने सर्वत्र दाणादाण उडवली आहे. तर काही गावांचा शेजारच्या गावाशी पुराच्या पाण्यामुळे संपर्क तुटला. त्यामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. नदी नाल्याच्या काठी आणि खोलगट भागांत राहणाऱ्या काही लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. तिथे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे तर अनेक ठिकाणी शेती पीक पाण्याखाली आली आहे. . तर दुसरीकडे बऱ्याच दिवसाच्या अंतराने परतीचा पाऊस आल्यामुळे कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकरी सुखावला आहे.

पुसद तालुक्यात संततधार पडलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत पुसद तालुक्यातील बहुतांश भागांमध्ये दि. १० सप्टेंबर ते १२ सप्टेंबरपर्यंत संततधार पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत पडलेल्या पावसामुळे हंगामी पिकांना व नगदी पिकांना संजीवनी मिळाली आहे. सतत पडलेल्या पावसामुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहे. तालुक्यामध्ये दि.१० सप्टेंबर रोजी १.३ मी मी पावसाची नोंद झाली आहे. तर दि. ११ सप्टेंबरला ४१ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तालुक्यात एकंदरीत जवळपास ४५ मिनिटे पावसाची नोंद झाली असून कुठेही पिकांना नुकसान झाल्याची माहिती तहसील विभागाचे तहसीलदार राजेश चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...