आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:एसपींनी केले शांततेचे आवाहन

महागाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रत्येक गणेश मंडळाला जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शांततेचे आवाहन केले. तसेच प्रोत्साहनपर म्हणून मंडळाला टी शर्ट देवून गौरवण्यात आले.

यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्वत: गावातून पायी गणेश मंडळाला भेट दिल्याने त्यांची गावकऱ्यांनी प्रशंसा केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत महागाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विलास चव्हाण, वाहतूक पोलिस निरीक्षक खेडेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास पाटील, संजय भगत, जन आंदोलन संघर्ष आधार समितीचे अध्यक्ष जगदीश नरवाडे, सामाजिक कार्यकर्ते संजय सुरोशे, महागाव, यवतमाळ येथील पोलिस दलातील चमू यावेळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...