आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊसाची हजेरी:जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस; रात्रभर विजेचा लपंडाव सुरू

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात शनिवारी वातावरणात बदल जाणवला. सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस कोसळला. तर जिल्ह्यातील दिग्रस शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. मात्र, रविवारी सकाळी ढगाळ वातावरण होते. तर दुपारच्या सुमारास कडक उन्ह पडले होते.

मे महिन्यात उन्हाचा पारा ४६ अंश सेल्सियसवर पोहोचला होता. मात्र, जून महिना लागताच वातावरणात बदल होण्यास सुरवात झाली. शनिवारी दुपारपासून वातावरणात बदल जाणवत होता. परंतु, सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह तुरळक पावसाने हजेरी लावली. सुसाट वारा असल्यामुळे अनेक गावातील नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले.

दिग्रस शहरासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात पावसाने शनिवारी हजेरी लावली. वातावरणात गारवा निर्माण झाला होता. दिवसभर तप्त उन्हामुळे सर्वसामान्य हैराण होते. तर रात्री वारंवार वीज बत्ती गुल होत असल्याने अनेकांना उकाड्याचा सामना करण्याची वेळ आली. या प्रकारामुळे वीज वितरण कंपनीबद्दल नागरिकांत प्रचंड असंतोष पसरला होता. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने सर्वसामान्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले.

बातम्या आणखी आहेत...