आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:भरधाव दुचाकीची नीलगाईला धडक, एकाचा रुग्णालयात मृत्यू

दारव्हा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव दुचाकीस्वाराला निलगायने दिलेल्या धडकेत त्याचा गंभीर जखमी होवून मृत्यू झाला. ही घटना जुना दिग्रस मार्गावर असलेल्या शरद लाभशेटवार यांच्या शेताजवळ गुरूवार, दि. १० नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास घडली. सुभाष माधवराव राऊत वय ५५ वर्ष रा. देऊळगाव वळसा असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी प्राप्त माहितीनूसार, दारव्हा येथून जुना दिग्रस रोडने सुभाष राऊत वळसा येथे जात होते.

अश्यात अचानक रस्त्यात आडवी आलेल्या नील गाईला दुचाकीची धडक बसली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेवून जखमी दुचाकीस्वाराला तत्काळ उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारांकरिता दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे जिल्हा रुग्णालय येथे रेफर करण्यात आले. यावेळी उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला.

ऑटोतून तोल गेलेल्या महिलेचा बसखाली येऊन मृत्यू
दारव्हा । शेतातून कापसाचे गाठोडे घेऊन ऑटोने घरी जात असलेल्या महिलेचा ऑटोतून तोल गेल्याने तिचा एसटी बसखाली येऊन महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवार दि. १० नोव्हेंबरला सायंकाळच्या सुमारास घडली. सरस्वती रवींद्र बोरचाटे वय २८ वर्ष असे मृत महिलेचे नाव आहे. शेतातून सायंकाळी ऑटोने घरी परत येत असताना तळेगाव ते खुपगाव रस्त्यावरील वळणावर ऑटोतून तोल जाऊन दारव्हा आगारातून अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या बसच्या मागील चाकाखाली येऊन महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेत. पोलिसांना याबाबत माहिती दिली. या घटनेचा पुढील तपास दारव्हा पोलिस करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...