आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्स्फूर्त प्रतिसाद:चला बनवूया मातीचे गणराया' स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरखेड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ऐवजी मातीच्या मूर्तीची स्थापना करण्याचे संस्कार बाल मनावर पडावे व त्यांनी अधिकाधिक लोकांना प्रोत्साहित करावे या उदात्त हेतूने नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्था उमरखेडच्या वतीने येथील महात्मा बसवेश्वर संस्थान मध्ये आयोजित “चला बनवूया मातीचे गणराया” या स्पर्धेत शेकडो बाल कलावंतांनी एकाहून एक सुंदर अशा मातीच्या मूर्ती घडविल्या.

या स्पर्धेत वर्ग एक ते सहा च्या “अ” गटात समर्थ महामुने या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक पटकावला असून विश्वजीत दुधेवार यांस द्वितीय, शितल सुकळे या विद्यार्थिनीस तृतीय, राधिका हिंगमिरे व कृतिका कांबळे या विद्यार्थिनींना उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे. तसेच वर्ग सात ते बारा मधील “ब” गटासाठी विवेक माकोडे यांस प्रथम, सागर काळबांडे यांस द्वितीय, हर्षवर्धन काळबांडे यांस तृतीय, राधा साकळे या विद्यार्थिनीस उत्तेजनार्थ, सुदर्शन भोजरे व ओम चौधरकर या विद्यार्थ्यास उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन पुरस्कृत करण्यात आले. यावेळी रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, गौरवचिन्ह देऊन चितंगराव कदम माजी जि. प. सदस्य यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश अप्पा दुधेवार माजी शिक्षण सभापती न. प.,वनपरिक्षेत्र अधिकारी पांडे, डॉ. शिवानंद कवाने, डॉ. आशिष उगले, प्रफुल कोमलवार, म. बसवेश्वर संस्थानचे अध्यक्ष संतोष अप्पा हिंगमिरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

स्पर्धेत एकूण २२७ मुला-मुलींनी भाग घेतला. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्थेचे प्रभाकर दिघेवार, दिपक ठाकरे, गजानन रासकर, काशिनाथ कुबडे यांनी परिश्रम घेतले. गजानन वानखेडे व गजानन साखरे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. यावेळी प्रा. डॉ. अनिल काळबांडे, सचिन कटके, प्रा. संदीप चेडे, सागर बारे, श्रीराम बिजोरे, राजेश भोकरे इत्यादी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मनोज कदम यांनी केले व आभार प्रदर्शन श्रीराम बिजोरे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...