आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्थानिक जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात गुरूवार, दि. ३१ मार्च रोजी सर्व विभागातील अंतिम वर्षाच्या ३७० विद्यार्थ्यांसाठी रोजगार प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात प्रशिक्षणाचे आयोजन टेक्कवॉलनट यांच्या सोबत जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाने केलेल्या सामंजस्य करारा मार्फत करण्यात आले होते. या प्रसंगी टेक्कवॉलनटचे सीईओ अक्षय केकरे, लॉजीकशालाचे प्रशिक्षक ओंकार केकरे, संस्थेचे सचिव डॉ. शीतल वातीले, प्राचार्य डॉ. हेमंत बारडकर आदी उपस्थित होते. या ट्रेनिंगमध्ये विद्यार्थ्यांना ब्रिसा टेक्नॉलॉजी आणि तस्तम कंपन्यांसाठी आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. तसेच इंजिनिअरिंग रिव्हॉलुशन, कॅम्पस डिजिटलायझेशन आदी विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कोणत्याही कंपनीमध्ये नोकरी मिळवताना प्रत्येक उमेदवाराला अॅप्टीटयुटटेस्ट, ग्रुप डिस्कशन व पर्सनल इंटरव्ह्यूला समोर जावे लागते, त्याच सोबत प्रामुख्याने व्यक्तीमत्व विकासाचा प्रभाव महत्वाचा असतो. विद्यार्थ्यांची तार्किक क्षमता, न्यूमरीकल अॅबिलीटी, नोकरी विषयी कामाची अभिक्षमता या संदर्भात सुद्धा माहीती दिली. संस्था सचिव डॉ. शीतल वातिले यांनी सांगीतले विद्यार्थ्यांना विविध नोकरीच्या संधि उपलब्ध करुन देने हे जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ध्येय आहे.
अभियांत्रिकी विभागीय परीक्षा व कंपनी प्लेसमेंट करीता होणाऱ्या परीक्षेत विविध कौशल्यावर आधारीत प्रश्नांचा समावेश असतो. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या परीक्षांमध्ये नेत्रदीपक यश मिळावे व त्यांचे भविष्य उज्वल व्हावे यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन महाविद्यालयीन प्रशासनाने केले. याप्रसंगी संचालन प्रा. सोनाली धुळे तर आभार प्रदर्शन प्रा. प्रियंका कदम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सचिव डॉ. शीतल वातीले, संचालक पवन वातीले व प्राचार्य डॉ. हेमंत बारडकर यांच्या मार्गदर्शनात सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वृंद, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.