आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ:स्टेट बँक चौकात केला बेछूट गोळीबार, तरुणाचा मृत्यू, शहरात गँगवॉरची शक्यता

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिवंत काडतुसह धारदार शस्त्र जप्त

जुन्या वादाच्या कारणावरून एका २९ वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला चार ते पाच जणांनी सहा बेछूट गोळीबार केला. ही घटना यवतमाळ शहरातील स्टेट बँक चौक परिसरात बुधवार, दि. २३ जूनला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. या बेछूट गोळीबारामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे. करण परोपटे वय २९ वर्ष रा. राणी अमरावती ता. बाभुळगाव असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रकरणी प्राप्त माहितीनुसार, यवतमाळ शहरातील स्टेट बँक चौकात बाभुळगाव तालुक्यातील राणी अमरावती येथील तरुण करण परोपटे हा काही कामानिमित्त बुधवारी आला होता.

यावेळी तो एका हॉटेल समोर उभा असतांना रात्री ८.३० वाजताच्या सुमारास चार ते पाच तरुणांनी अचानक येऊन करणवर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारामध्ये करण परोपटे याला तीन आणि हॉटेल चालक गुप्ता याला एक गोळी लागल्याने ते दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन जखमींना तातडीने यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. यात उपचारादरम्यान करण परोपटे याचा मृत्यू झाला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, शहर ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वृत्त लिहिपर्यत या प्रकरणी शहर ठाण्यात गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरू होती.

शहरात गँगवॉर होण्याची शक्यता
काही दिवसांपूर्वी यवतमाळ शहरातील चांदोरे नगरात एक वाद झाला होता. याबाबत यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आला होता. त्याच कारणावरून हा गोळीबार झाला असावा, असा अंदाज पोलीस सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.

जिवंत काडतुसह धारदार शस्त्र जप्त
करण परोपटे खून प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून एक जिवंत काडतुस, तीन खाली केस (काडतुसे) आणि एक धारदार चाकू आदी साहित्य जप्त केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...