आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सुदृढ शरीर, निरोगी आरोग्यासाठी खेळ आवश्यक‎ ; जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धेला सुरुवात‎

यवतमाळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निरोगी आरोग्यासाठी खेळ अतिशय‎ आवश्यक असल्याचे प्रतिपादन‎ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी‎ व्यक्त केले. शिक्षण विभाग संवर्धक‎ मंडळाच्या विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी‎ आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा‎ स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत‎ होते.‎ सोमवार दि. ६ फेब्रुवारी रोजी‎ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या‎ हस्ते नेहरू स्टेडियम यवतमाळ येथे‎ स्पर्धेचे उद॰घाटन पार पडले.‎ कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा‎ परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी‎ डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची प्रमुख‎ उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी‎ म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक‎ शिक्षणाधिकारी प्रमोद सुर्यवंशी,‎ माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सीमा‎ पापळकर, राजू मडावी, मारोती‎ मडावी, श्रीधर किन्हाके, सहाय्यक‎ गटविकास अधिकारी किशोर गोडे,‎ गटशिक्षणाधिकारी विद्या वैद्य,‎ विस्तार अधिकारी पोपेश्वर भोयर,‎ सुभाष धवसे, प्रणीता गाढवे, नलिनी‎ वंजारी, दिपीका गुल्हाने यांच्यासह‎ जिल्ह्याचे सर्व गटशिक्षणाधिकारी,‎ विस्तार अधिकारी, सर्व केंद्र‎ प्रमुखांची उपस्थिती होती. या प्रसंगी‎ उपस्थितांच्या हस्ते रिमोटद्वारे मशाल‎ ज्योत तथा क्रीडा ज्योत प्रज्वलित‎ करण्यात आली. त्यानंतर प्रास्ताविक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ प्रमोद सूर्यवंशी यांनी केली. यावेळी‎ विद्यार्थ्यांना व पंचांना शपथ देण्यात‎ आली. उद्घाटन प्रसंगी विविध‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले.‎ स्वागत गीत महागाव (क) येथील‎ विद्यार्थ्यांनी सादर केले. तसेच छत्री‎ नृत्य सराटी या शाळेने, बंजारा नृत्य‎ घाटना, शिवाजी महाराजांविषयी‎ पोवाडा नृत्य लोहारा, लेझीमनृत्य‎ वाटखेड (खू.) तसेच चित्तथरारक‎ रोप मल्लखांब किन्हाळा, गळव्हा या‎ शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. या‎ नृत्याकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते.‎

बातम्या आणखी आहेत...