आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थी केवळ शैक्षणिक अभ्यासाचाच मागे लागला असून अधिकाधिक गुण कसे मिळतील याकडे लक्ष असल्याने मैदानी खेळाकडे त्याचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्यांनी अभ्यासाबरोबर खेळात सुद्धा सहभागी झाले पाहिजे असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी केले. ते स्थानिक हाजी अमानुल्ला जहागीरदार ज्युनिअर कॉलेज येथे झेनिथ सांस्कृतिक व क्रीडा सामने यांच्या उद्घाटन सोहळ्यात उद्घाटक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. संतोष जैन होते.
तर प्रमुख अतिथी म्हणून नगरपालिकेचे मुख्याधिकारी जामनेर, साहित्यिक डॉ. अनिल काळबांडे, क्रिडा प्रशिक्षक अजय भागवत, शेख मुशीर, अजीम मुल्ला खान, अमजद पठाण, शेख मोहम्मद, डॉ. गाजी असर उपस्थित होते. यावेळी तालुक्यातून दोनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम आलेला अंजला मिर्झा, लांब उडी आणि भालाफेक मध्ये प्रथम आलेला शेख अयान शेख रियाज यांच्यासह गुणवत्ता प्राप्त खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडा शिक्षक नसरुद्दीन, शाळा समितीचे अध्यक्ष आरिफ उजमा उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक समीर अहमद यांनी तर संचालन फिरोज जनाब यांनी केले. आभार नासिर खान यांनी मानले. या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षका सह कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.