आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‎ संसर्गजन्य रोगाने थैमान:लम्पीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी‎ मनसेकडून औषध फवारणी‎

चिखली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎मागील महिन्याभरापासून बुलडाणा जिल्ह्यात लम्पी या‎ संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे, बुलडाणा‎ जिल्ह्यात या आजारामुळे ९० ते १०० गायी व बैल मृत‎ पावले आहेत. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात‎ सापडला आहे. या आजाराला आळा घालण्यासाठी‎ महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हा संघटक‎ शैलेश गोंधणे यांच्या नेतृत्वात, शैलेंद्र कापसे‎ जिल्हाध्यक्ष मनविसे विनोद खरपास, प्रदीप भवर,‎ स्वप्नील असोले, सुदर्शन गवई व बद्री गाढवे यांच्या‎ प्रमुख उपस्थितीत अमडापूर जि.प. सर्कल मधील‎ दहिगाव व परिसरातील गावामध्ये जनावरांच्या गोठ्यात‎ ट्रॅक्टर द्वारे फवारणी केली.

‎ तसेच तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. दांडगे‎ डॉ. लोणे, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निळे‎ यांच्याशी शैलेश गोंधणे यांनी चर्चा करून लम्पी हा‎ आजार आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने खबरदारी‎ घ्यावी अशी सूचना केली. दहिगाव परिसरातील‎ फवारणी प्रसंगी विनोद देवकर, श्याम कुलकर्णी, राजू‎ ढोमने, ज्ञानेश्वर होरकळ, विष्णू वांजोळ, भागवत‎ कपले, अविनाश लोढे, गणेश वांजोळ, चैतन्य खरपास,‎ भारत ठोंबरे, स्वप्नील खरपास, अभिषेक बेदरकर,‎ समाधान पवार, समाधान रसाळ, प्रभाकर रसाळ,‎ डिगांबर भाऊ, गोपाल गाढवे, नारायण होगे, आशिष‎ गायके, राणा दर्पणसिंग ठाकूर, स्वप्निल तरमळे, गणेश‎ इंगळे, संकेत पाटील, विनायक वराडे विशाल पाटील,‎ ऋषिकेश गायकवाड, दत्ता झुंबड, दिगंबर शिंगाडे,‎ विठ्ठल जाधव आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...