आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील केवटे ले-आऊमधील श्री सत्य साई सेवा समिती प्रार्थनास्थळी यवतमाळ जिल्हा श्री सत्य साई सेवा समिती कळंब, उमरसरा व वाघापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १५ डिसेंबर रोजी मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले.
या शिबिरामध्ये एकूण ३१२ रुग्णांनी नोंदणी केली होती. डोळे तपासणी व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबीर महात्मे नेत्रपेढी, नेत्र रुग्णालयात नागपूर, जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती यवतमाळ व वोलकार्ट फाउंडेशन इंडियन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त सहकार्याने घेण्यात आले असता सदर शिबिरामध्ये ३१२ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. ६५ नागरिकांना अल्प दरात १५० रुपयांमध्ये चष्मे वाटप करण्यात आले. १७४ नागरिक मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आले.
यावेळी महात्मे नेत्र पिढी नागपूर रुग्णालयाचे ७ डॉक्टर उपस्थित होते. तर मोफत नेत्र तपासणी शिबिराच्या यशस्वितेसाठी कळंब येथील श्री सत्य साई सेवा समितीचे आध्यात्मिक प्रमुख भास्करराव महाजन, समिती प्रमुख धनराज घोडे, सेवादल प्रमुख आनंद धोबे, गुलाबराव धोबे, बालविकास प्रमुख प्रतिभाताई रमेश मेत्रे, संजय वाके, सुरेशराव पन्नासे, रामदास गोरे, सुभाष उमरसरा येथील निंबाळकर, एस. आर गायकवाड, डॉ. कृष्णा राठोड, अन्नाजी वानखडे, गोविंदराव मोहुर्ले, बाबाराव नक्षणे, निरंजन फुलकर, रामचंद्र कोल्हारे, दत्ता शिरभाते, अरविंद महाजन, नारायण गोरे, आकाश ढवळे, गजानन खेरडे, मोहन झोडे, मारोतराव चहारे, विनोद ठाकरे, स्वप्नील नक्षणे, निलेश नवाडे, संजय गवळी, तुळशीदास होले, रामभाऊ अंबाडेरे, अर्जुन मोने, अश्विन गाऊत्रे, निलेश मेत्रे, घरत सर (भिडी), विठ्ठल नेहारे, अक्षय महाजन, योगेश गावंडे, भास्कर महाजन (मांजरवघळ), तुषार मेत्रे, चंदु डंभे, रामकृष्ण राऊत (वाघापूर) ईत्यादी सत्यसाईसेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी शिबिरासाठी परिश्रम घेतले, असे कळवण्यात आले
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.