आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:डिझेल भरण्यासाठी एसटी बसेस खाजगी पंपावर; शासकीय दर 24 रुपयाने जास्त असल्यामुळे डिझेलची खरेदी बाहेरून

यवतमाळ5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने डिझेलवरील अनुदानाबाबत निर्णय घेतल्याने डिझेलचे दर वाढले आहेत. यामुळे एसटी महामंडळाला आर्थिक फटका बसत आहे. खासगी पंपाच्या तुलनेत शासकीय खरेदीसाठी लिटर मागे २४ रुपये जादा मोजावे लागत आहेत. यामुळे खासगी पंपावरून डिझेल खरेदी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

यवतमाळ विभागातील सर्व आगाराच्या बसेस आता खासगी पंपावर डिझेल भरून घेत असल्याने होणारा तोटा कमी झाला. यवतमाळ विभागात रोज १४० बसेस धावत असून त्यांना ७ हजार लिटर डिझेल लागते. लिटरला २४ रुपये जादा मोजल्यास एसटीला १ लाख ६८ हजार जादा मोजावे लागतील. खासगी पंपावर डिझेल भरले जात असल्याने ही रक्कम वाचवण्यात यश आले आहे.

गेल्या साडेचार महिन्यापासून एसटी महामंडळाला आंदोलनाची घरघर लागली आहे. यातच पुन्हा इंधनाच्या दरात वाढत झाल्याने अगोदरच तोट्यात असलेल्या लालपरीला जास्तीचा भुर्दंड बसत आहेत. यातून मार्ग काढत शासनाने गेल्या आठवड्यात खासगी पंपावरून डिझेल भरून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व आगारातील बसेसला त्यांच्या जवळच्या पंपावर डिझेल किरकोळ दराने मिळण्यासाठी चार दिवसांपासून पंपचालकांकडून कोटेशन मागवण्याचे काम सुरू होते. त्यात ज्या पंप चालकांनी किरकोळ दरातही काही प्रमाणात सवलत दिली अशा पंपावरून डिझेल भरून घेण्यास प्रारंभ झाला आहे. महामंडळाला दिवाळीपासून लागलेले ग्रहण शिमगा झाला तरी सुटण्याचे नाव घेत नसल्याचे समोर आले आहे. दिवाळीपूर्वी महागाई वाढल्याने तिकिटाचे दर वाढवले होते. त्यानंतर संप सुरू झाला.

खासगी पंपावरून खरेदी आता इंधन महाग झाल्याने पर्याय शोधून डिझेल स्वस्तात मिळवले आहे. यापूर्वी महामंडळाने २०१३-१४ या वर्षीही असा प्रयोग केला होता. घाऊक दरापेक्षा किरकोळ दर कमी असल्याने तब्बल एक वर्ष खासगी पंपावरून डिझेल खरेदी केले होते. आताही तशीच अथवा त्या पेक्षाही जास्त महाग अशी स्थिती निर्माण झाल्याने महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...