आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच लॉकडाऊनमुळे आर्थिक फटका बसलेल्या एसटी महामंडळाला आता पुन्हा कोरोनाने बेहाल केले आहे. यामुळे एसटी महामंडळाचे मार्च महिन्यात प्रतिदिनी ५ ते ९ लाख रूपयांचे उत्पन्न घटले आहे. कोरोनामुळे एक वर्षापासून एसटी तोट्यात चालू असून आगामी काळात भारमान प्रमाणापेक्षा कमी होत आहे. प्रशासनाने वाहतूक सेवा ५० टक्के क्षमतेवर सुरू ठेवण्याचे आदेश दिेले आहे. तसेच धार्मिक, सार्वजनिक ठिकाणी ५० टक्के उपस्थितीची मर्यादा घातली आहे.
यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी ग्रामीण भागातून शहराकडे येणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली असून ती वाढेल का याची चिंता आहे. याचा परिणाम एसटी बसच्या प्रवाशांवर होत आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्यापूर्वी जिल्ह्यातील एसटी बसचे ५० पेक्षा अधिक भारमान होते. मात्र, कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने भारमानाचे प्रमाण ३५ ते ४० टक्क्यावर आले आहे. प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळत असल्याने महामंडळाने प्रवाशांच्या उपलब्धतेनुसार बस सेवा सुरू ठेवली आहे. अति दुर्गम भागातील बस फेऱ्या रद्द केल्या आहे. प्रवासी रोडावल्याने महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे.
बाहेर जिल्ह्यातील लॉकडाऊनचा परिणाम
राज्यातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन आहे. विभागाचे नागपूर मार्गावर अनेक बस फेऱ्यांचे नियोजन असते. परंतु नागपूर येथे लॉकडाऊन असल्याने प्रवासी संख्या कमी झाली आहे. तसेच परभणी विभागाने शहरात प्रवेश नाकारल्याने यवतमाळ विभागाला तोटा सहन करावा लागत आहे. श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक
एसटीचे प्रतिदिनी ५ ते ९ लाखांचे उत्पन्न घटले
जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातील लांब पल्ल्याच्या फेऱ्यांसाठी ४५८ बस धावतात. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातील लांब पल्ल्याच्या बसचे भारमान कमी झाले आहे. यामुळे फेब्रुवारी महिन्यात प्रतिदिनी ४५ लाख रुपयांचे उत्पन्न मार्च महिन्यात कमी होऊन प्रतिदिनी ३५ लाखांवर आले आहे. एक वर्षापासून एसटी महामंडळ तोट्यात बस चालवत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.