आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:पुण्यरथा नगारे यांना राज्यस्तरीय नवोपक्रमशील शिक्षक पुरस्कार

उमरखेड17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यस्तरीय अग्नि पंख शैक्षणिक समूहाद्वारे आयोजित उपक्रमशील शिक्षक राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा २०२१-२२ नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात नागापूर रूपाळा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळेतील उपक्रमशील शिक्षिका पुण्यरथा नगारे (मुनेश्वर) यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. ए. ए. नातू ( रसायन शास्त्रज्ञ तथा नोबेल पारितोषिक विजेते) यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रादेशिक विद्या प्राधिकरणचे माजी संचालक डॉ. रवींद्र रमतकर उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी पांडुरंग खांडरे, अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे नितीन भालचंद्र, गटशिक्षणाधिकारी वसंत महाले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक नामदेव गोपेवाड, गजानन गोपेवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून श्रीराम टॉकीज मंगल कार्यालय येथे पार पडला. या कार्यक्रमात राज्यभरातून ४३ नवोपक्रमशील शिक्षक, शिक्षिका व ४ बाल शास्त्रज्ञ यांचा गौरव करण्यात आला. या सत्काराचे श्रेय नगारे ह्या गटशिक्षणाधिकारी पांडुरंग खांडरे, शाळेतील सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी देशपांडे, शिक्षक केंद्रे यांना देतात.

बातम्या आणखी आहेत...