आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:राज्य अधिकारी संघटनेने केला त्या घटनेचा निषेध

यवतमाळ3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या चेहऱ्याला शाई लावल्याच्या घटनेचा बुधवार, दि. २२ जून रोजी राज्य विकास सेवा व इतर अधिकारी संघटनेच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, संबंधितावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

यवतमाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी केशव गड्डापोड यांनी सोमवारी पदभार स्विकारला. दरम्यान, मंगळवार, दि. २१ जून रोजी तालुक्यातील वाट खेड येथील महिलांसह पुरुषांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षामध्ये प्रवेश केला. आणि कुठल्याही प्रकारची चर्चा न करता त्यांच्या चेहऱ्याला शाई लावून मानहानी केली. कार्यालयीन कामकाजात व्यत्यय निर्माण केला. या भ्याड हल्ल्याचा बुधवार, दि. २२ जून रोजी महाराष्ट्र राज्य विकास सेवा व इतर अधिकारी संघटनेच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आले आहे.

यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पांचाळ यांना निवेदन देण्यात आले. या घटनेतील गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंकज भोयर, अरविंद गुडधे, प्रदीप नाल्हे, लता मोहीते, ज्योती भोंडे, पद्माकर मडावी, राजेंद्र माळोदे, पीयुष चव्हाण, डॉ. पी. एस. चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी हजर होते.

बातम्या आणखी आहेत...