आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिलांनी व मुलींनी आपली स्वतः ची सुरक्षा स्वतः केली पाहिजे त्यासाठी सक्षम होणे काळाची गरज आहे. आपण कसे वागतो, आपण कोणाची संगत केली पाहिजे कोणाची नाही हे समजणे आज आवश्यक झाले आहे. मुलींनी व स्त्रियांनी मोबाईल वापरतांना कोणत्या गोष्टी आपल्या फायद्याच्या आहे व कोणत्या नुकसान पोहोचवू शकते याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण आपल्या निष्काळजी वागणाने आपले केव्हाही नुकसान होऊ शकते त्यासाठी मुलींनी व स्त्रियांनी खंबीरपणे वागणे काळाची गरज असल्याचे मत अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन आयटक अध्यक्षा तथा राज्य कौन्सिल सदस्या रचना जाधव यांनी व्यक्त केले. दिग्रस तालुक्यातील चिंचोली क्रमांक २ येथील जिल्हा परिषद शाळेत जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच मीनाक्षी देशमुख, आयटक संघटना सचिव रमा गजभार, अंगणवाडी - बालवाडी कर्मचारी युनियन आयटक अध्यक्षा तथा राज्य कौन्सिल सदस्या रचना जाधव, एकात्मिक बाल विकास सुपरवायझर सुनंदा वाघ, आरोग्य सेविका कल्पना वाघाडे, चिंचोली अंगणवाडी सेविका इंदू सोनुने, कांता जयस्वाल, वैदेही कांबळे, वर्षा ढाले, शीतल इंगोले, मंदा कांबळे, सविता मिरासे, सोनाली चिकने, संध्या तायडे उपस्थित होत्या. जागतिक महिला दिनाच्या सुरवातीला विद्येची देवता माता सरस्वती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पूजनाने झाली. यावेळी उपस्थित मान्यवर महिलांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.