आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्या भारतभूच्या वीर पुत्राची, देश भक्तीची उत्कट भावना, प्रखरता संपूर्ण जगाने अनुभवली. त्या सावरकरांवर टीका करणे ही आपली संस्कृती नाही आणि योग्यताही नाही. म्हणतात ना नाही निर्मल जीवन काय करेल साबण; जैशी दृष्टी तैशी सृष्टी!//" त्यामुळे दृष्टी नव्हे दृष्टीकोन बदला सावरकर कळेल” असे मार्मिक उद्गार गौरव यात्रा समापन प्रसंगी यवतमाळचे आमदार मदन येरावार यांनी व्यक्त केले. संत सेना महाराज चौक येथे गौरव यात्रा समापन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर राष्ट्रिय स्वयंसेवक संघाचे नगर संघ- चालक धनंजय पाचघरे, प्रमुख वक्ते, डॉ. सतपाल सोहळे, सावरकर विचाराचे अभ्यासक डॉ. नितीन खर्चे, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, शिवसेनाजिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगणवार, जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, पराग पिंगळे, भाजपा शहर अध्यक्ष प्रशांत यादव पाटील, भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष रेखा कोठेकर उपस्थित होते.
यावेळी विचार व्यक्त करताना येरावार म्हणाले की, सवंग लोकप्रियतेसाठी देवी-देवता, देशप्रेमी- देशभक्त, प्रज्ञावंत- विचारवंत, यांच्या बद्दल अनुद्गार काढणे. पात्रता, योग्यता नसतानाही त्यांचा अनादर करणे, अपमान करणे हे उचित नाही, योग्य नाही, सुसंस्कृतपणाचं लक्षणही नाही. ज्या देशाने जगाला विचारा सोबत विवेकही दिला, ज्या देशाच्या अध्यात्माने संपूर्ण विश्वाला वसुधैव कुटुंबकम्'', हे विश्वची माझे घर हा संदेश दिला त्या देशात हे शोभत नाही असेही येरावार म्हणाले.
याप्रसंगी सावरकर विचाराचे सखोल अभ्यासक डॉ. सतपाल सोहळे यांनी एक भावनिक वृत्तांत कथन केला. अंदमानच्या जेल मध्ये खायला मिळणारे उदान्न, यातना देणारा कोल, वेताचे फटके, खोडाबंदी, साखळदंडाने करकचून आठ आठ दिवसापर्यंत बांधून ठेवणे, शारीरिक व मानसिक खच्चीकरण करणाऱ्या शिक्षा आणि या सर्वांची जाहिरात केली जात होती. केवढे हे क्रौर्य? हे ऐकुन सहन न झाल्यामुळे इंदू भूषण रॉय यांनी आत्महत्या केली. उल्हासकर दत्तवर हाउ वेडे झाले आणि हे सोसणारे, भोगणारे सावरकर अटल होते, निश्चल होते, कारण ते मृत्युंजय होते, अवध्य होते. अशा मृत्यूंजयांना माफीवीर म्हणने याचा विचार करण्याची वेळ आता आली असल्याचे ते म्हणाले. मधुरा वेरुळकर, ऋचा गढिकर यांनी वंदे मातरम ''हे राष्ट्रगीत सादर केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा आध्यात्मिक आघाडी पश्चिम विदर्भ संयोजक शंतनु शेटे यांनी केले. रेखा कोठेकर यांना आभार व्यक्त केले. हा उपक्रम संपन्न करण्यात भाजपा शहराध्यक्ष प्रशांत यादव पाटील, शिवसेनेचे पराग पिंगळे, भाजपाचे शंतनू शेटे, अजय खोंड, हेमंत दायमा, प्रा. डॉ. अमोल देशमुख, ज्ञानेश्वर सुरजूसे, राकेश मिश्रा, नितीन गिरी, रेखा कोठेकर, वैशाली खोंड, माया शेरे, उषा खटे, आकाश धुरट, योगेश पाटील, उमेश राठोड, शुभम चोरमले, सुरज जैन इत्यादींनी स्वयंस्फुर्तीने प्रयत्न केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.