आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिवांचा बहिष्कार:जिल्हा उपनिबंधकांना निवेदन; सेवा, वेतन विषयांची सोडवणूक होत नाही

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थामध्ये कार्यरत असणार्‍या गटसचिव व संस्था नियुक्त सचिवांचे सेवा व वेतनाचा प्रश्‍न प्रलंबित आहे. अनेक वर्षापासून हा मुद्दा प्रलंबित असतानाही यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे संगणकीकरण योजनेअंतर्गत ताळमेळ प्रमाणपत्राच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जिल्हा गटसचिव संघटनेने घेतला आहे. याबाबतचे निवेदन मंगळवार, दि. १ नोव्हेंबर रोजी जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आले.

सोसायटीमधील गटसचिव व संस्था सचिवांच्या वेतनाचा प्रश्‍न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. शासनाकडून गटसचिवांच्या सेवा व वेतनाचा प्रश्‍न कायम आहे. प्रलंबित प्रश्‍नाबाबत निर्णय होत नसल्याने प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांच्या संगणकीकरण योजनेअंतर्गत ताळमेळ प्रमाणपत्र कामकाजावर बहिष्कार घालण्याचा निर्णय राज्य गटसचिव संघटनेने घेतला आहे.

या असहकार आंदोलनात जिल्ह्यातील सर्व गटसचिव, संस्था नियुक्त सचिव सहभागी झाले आहेत. त्यांनी जिल्हा उपनिबंधकांना निवेदन दिले. निवेदन देताना संघटनेचे पी. एस. येंडे, सुरेंद्र चिंचोळकर, एस. बी. पांडे, मुनेश राठोड, शुभम लांडगे, दिलीप कराळे, बिपिन शिरपूरकर, शैलेश निस्ताने, विजय चव्हाण, श्रावण जाधव यांच्यासह संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...