आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील वरंदळी गावातील जनतेच्या विविध समस्येकडे सरपंचाचे गावकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निवेदन गटविकास अधिकारी रमेश खरोडे यांच्याकडे निकेत अनिल राठोड यांनी २५ जुलै रोजी दिले.गावातील समस्येबाबत वारंवार तोंडी अथवा लेखी पत्राद्वारे जनतेच्या समस्या सोडवण्याकरता अर्ज करण्यात आले. तसेच आजसुद्धा करीत आहे. सध्या उन्हाळा संपूर्ण जवळपास दोन ते तिन महिने झाले आहे. तरीपण आजही गावातील जनतेला पाण्यासाठी २ किलोमीटर अंतरावर असलेल्या वसंत नगरला जावे लागत आहे. शेतीच्या कामाच्या दिवसात जनतेला पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर उपाय योजना व्हावी तसेच गावातील जनतेला अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने त्यांना पोटाचे आणि साथीच्या आजाराची लागण होत आहे. त्यामुळे नियमित पाण्याच्या पाणी साठ्याचा शुद्धीकरणासाठी लागणारी ब्लिचिंग पावडर उपलब्ध करून त्यांचा वापर करण्यात येवून शुद्ध पाणी पुरवठा व्हावा. गावामध्ये ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचून त्यापासून मच्छराची पैदास तसेच घाण वासामुळे जनतेला आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यावर तात्काळ उपाययोजना करावी असे निवेदन सादर केले.
तसेच गावातील गेल्या महिन्याभरापासून लोकांना चिखल व पाण्यातून येणे व जाणे करावे लागत आहे. यासंबंधी गेल्या वर्षभरापासून येथील लोकांना पावसाळ्यात येण्याजाण्यासाठी हाल सोसावे लागत आहे. यावर तात्काळ मुरूम टाकण्यात यावे. वारंवार सांगून लेखी देवूनही आपण टाळाटाळ करीत आहात ही बाब अतिशय गंभीर असून जनतेचा रोष वाढवलेला आहे. त्यांची समस्या तसेच ग्रा. पं. ला पैसा नसल्याचे सांगून हया समस्या जशाच्या तशाच आहेत. आपणास वारंवार सांगूनही सदस्यांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करीत नसून सरपंच, उपसरपंच त्यांच्या मनाप्रमाणे कामातून पैसा कसा मिळविता येईल याकडे जास्त लक्ष असल्याचे निदर्शनात येते.
जेव्हा विरोधकांच्या वाढत असलेल्या समस्यांबाबत सदस्य आपणाकडे कामाविषयी तेव्हा आपण ग्रा. पं. ला निधी नाही म्हणून सांगतात.सदस्यांचे फोन उचलत नाही तसेच आपणास वारंवार माहीती मागीतली आहे ती आद्यापपर्यंत दिली नाही. असे आरोप निवेदनातून करण्यात आले आहे. सदस्य, सरपंच सभा झाल्याचे दाखविण्यात येते. तरी आमचा आपल्या कार्यभारावर भरोसा उडाला आहे तरी मागितलेली संपूर्ण माहीती पुराव्यासह देण्यात यावी आणि या मांडलेल्या समस्या विषयी आजच्या मासिक सभेत मंजूरी घेवून कामे पूर्ण करावीत अन्यथा आपणास जनतेच्या तीव्र रोषाला सामोरे जावे किंवा आम्हाला आंदोलन करणे भाग पडेल असे निवेदन निकेत राठोड यांनी दिले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.