आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिवहन महामंडळ:देऊळगाव साकरशा येथे‎ मुक्कामी बस सुरू करावी‎

खामगाव‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परिवहन महामंडळाची खामगाव‎ आगाराची बस देऊळगाव साकरशा‎ येथे मुक्कामी सुरू करण्यात यावी,‎ अशी मागणी विद्यार्थ्यानी आज २‎ जानेवारी रोजी आगार प्रमुखांकडे‎ एका निवेदनाद्वारे केली आहे तर बस‎ मुक्कामी राहावी, यासाठी‎ देऊळगाव साकरशा ग्रामपंचायतीने‎ ठराव घेतला आहे.‎ खामगाव आगाराची शिर्ला नेमाने‎ मार्गे देऊळगाव साकरशा या‎ गावांमध्ये मुक्कामी बस सुरू होती.‎

या बसने सकाळी सहा वाजता‎ निघण्यासाठी विद्यार्थ्यांना सुविधा‎ मिळत होती. देऊळगाव साकरशा हे‎ गाव खामगाव पर्यंत ३८ किमी आहे.‎ येथील विद्यार्थी खामगाव शहरांमध्ये‎ विवीध संस्था मध्ये शिक्षण घेत‎ आहेत. परंतु येथे सुरू असलेली‎ बस लॉक डाऊन पासून बंद‎ करण्यात आली आहे. त्यामूळे‎ सकाळी शाळेत जाण्यासाठी‎ विद्यार्थ्यांना कोणतीही बस नाही.‎

परिणामी विद्यार्थांना प्रवासादरम्यान‎ खूप अडचणी येत आहेत. तसेच‎ रुग्णालयात जातानाही अनेकदा‎ खासगी वाहन केल्याशिवाय पर्याय‎ नाही. येत्या काही दिवसांत‎ विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होणार‎ आहेत. बस अभावी विद्यार्थ्यांना‎ शाळेत पेपरला वेळेवर पोहोचणे‎ शक्य होणार नाही. त्यामुळे‎ विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होऊ‎ शकते. म्हणून खामगाव आगार‎ प्रमुखांनी बंद असलेली बस पूर्ववत‎ सुरू करावी, अशी केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...