आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासेवानिवृत्त अधिकारी लखानी यांच्या घरातून चोरट्यांनी तब्बल ६० तोळे सोन्यासह १५ लाखाची रोख लंपास केली होती. या प्रकरणी दोन चोरट्यांना एलसीबी पथकाने ताब्यात घेत त्यांच्याकडून ११ तोळे सोने जप्त केले. आणि दोघांनाही अवधुतवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले. तेव्हा चोरट्यांकडून रोखसह साहित्य असा साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त केला. असे असले तरी उर्वरीत सोन्याच्या रिकव्हरी वर संशय निर्माण झाला आहे.
दोन्ही चोरट्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. यावरून पोलिस वर्तुळात विविध चर्चेला उधाण आले. यवतमाळ शहरातील बालाजी सोसायटीत असलेल्या रंगोली मैदान जवळील सेवानिवृत्त अधिकारी लखानी धार्मीक कार्यक्रमासाठी कुटुंबीयांसह दि. २ सप्टेंबरला बैंगलोरला गेले होते.
अश्यात त्यांच्या घरातील किचनचे दार तोडून अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करीत बेडरूममधील जवळपास ६० तोळे सोने आणि जवळपास १५ लाखाची रोख लंपास केली होती. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अवधुतवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हे नोंदवण्यात आले होते.
दरम्यान दोन महिन्यानंतर या प्रकरणातील चोरट्यांना ताब्यात घेण्यात एलसीबी पथकाला यश आले. एलसीबी पथकाने ११ तोळे सोने आणि ७ लाख ९६ हजार रूपयाची रोख हस्तगत करीत चोरट्यांचा अवधुतवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर अवधुतवाडी पोलिसांनी त्या चोरट्यांची कसून चौकशी करीत त्यांच्याकडून ४ लाख ६९ हजार रूपयाची रोख आणि ७६ हजार रूपयांचे साहित्य असा जवळपास साडे पाच लाखाच्या मुद्देमाल हस्तगत केला. असे असले तरी जवळपास ६० तोळे सोने लंपास झाल्याची चर्चा त्यांच्या कुटुंबीयांमध्ये होती. मात्र पोलिस दप्तरी २५ ते ३० तोळे सोने चोरी गेल्याची नोंद होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.