आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारभारात सुधारणा करण्याचा इशारा:रुग्णालयासाठी गोरसेनेचा रास्ता रोको

मानोरा5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरामध्ये शासनाकडून शहर आणि तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा माफक दरात आणि तातडीने मिळेल या आशेने बांधण्यात आलेले आरोग्य रुग्णालय शासकीय व प्रशासकीय अनास्थेचे बळी मागील अनेक वर्षांपासून ठरलेले असल्याने शासनाच्या कानापर्यंत ही अकर्मण्यता पोहोचवण्यासाठी वारंवार लेखी पाठपुरावा करूनही जैसे थे स्थितीमध्ये कुठलीच सुधारणा होत नसल्याचे लक्षात आल्याने गोरसेना ह्या सामाजिक संघटनेने तालुका भरातील गोरसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये झेंडा चौकात रास्ता रोको आंदोलन करून आरोग्य प्रशासनाला आपल्या कारभारात सुधारणा करण्याचा इशारा दिला.

ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य द्वारापासून तर झेंडा चौकापर्यंत आंदोलकांनी चालत जाऊन झेंडा या मुख्य चौकात बारा वाजताच्या दरम्यान लोकशाही मार्गाने केलेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे तासभर शहरातील वाहतूक ठप्प झाली होती. ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना २४ तास शुद्ध पेयजल मिळावे, बाराही महिने रुग्णालय स्वच्छ ठेवण्यात यावे,रुग्णालयामध्ये भरती रुग्णांना औषधोपचार बाहेरून न आणता रुग्णालयातच मिळावे, रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी असलेला चिखल मिश्रित रस्ता दुरुस्त करण्यात यावा, रुग्णालयाच्या मुख्य द्वारापासी बेकायदेशीर धंदे बंद करण्यात यावे, रुग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची मनमानी बंद करण्यात यावी.

रुग्णालयाची रखडलेली इमारत तातडीने बांधण्यात येऊन येथे येणाऱ्या रुग्णांची सोय करण्यात यावी. या व इतरही काही मागण्यांचे निवेदन रास्ता रोको आंदोलन स्थळी रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. नांदे यांनी येऊन स्वीकारले. पुढील दोन आठवड्यात आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केलेल्या मागण्यांचा सकारात्मक विचार जर नाही झाला तर संपूर्ण वाशिम जिल्ह्यामध्ये मानोरा तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या तालुका प्रशासन आणि जबाबदार शासनाविरोधात उग्र आंदोलन उभारण्याचा इशारा गोरसेना तालुका अध्यक्ष गोपाल चव्हाण आणि शेकडोच्या संख्येत जमा झालेल्या गोर सेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी यावेळी प्रशासनाला दिला.

बातम्या आणखी आहेत...