आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळा:डीएव्ही शाळेचे घुग्गुसला हाेणारे स्थलांतर थांबवा ,पालकांची जिल्हा कचेरीवर धडक; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेकोलिशी अधिनस्त असलेली डीएव्ही इंग्रजी माध्यमिक शाळा घुग्गुस येथे स्थलांतरित न करता भालर वसाहत येथे स्थानांतरण करावे याकरिता सोमवारी विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. दरम्यान, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन दिले.वणी तालुक्यात येणाऱ्या वेकोलित डीएव्ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या माध्यमातून दर्जेदार शिक्षणाचा विद्यार्थ्यांना मिळत आहे. वेकोलि कर्मचाऱ्यांच्या मुलांबरोबरच प्रकल्पग्रस्त, शहरासह तालुक्यातील इतरही असे मिळून जवळपास ८६० विद्यार्थी शिक्षण घेतात.

त्यांचे शैक्षणिक भवितव्य उंचावण्यात शाळेचे महत्वपूर्ण योगदान आहे. शाळेतील असंख्य विद्यार्थी उच्च पदावर विराजमान आहेत. सध्या जीर्णावस्थेत असलेल्या शाळेच्या इमारतीचा दाखला देत ही शाळा तालुक्यातून हद्दपार करण्याचा डाव आखण्यात आला आहे. तसेच पूर्ण वर्ग स्थलांतरित न करता त्यातील मोजकेच वर्ग घुग्गुस येथे स्थलांतरित करत आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

हे स्थानांतरण होऊ नये याकरिता निलजई, तरोडा, लाठी, बेसा, गणेशपूर, पुनवट, शेलू उकणी, मुंगोली, माथोली, चिखलगाव, नायगाव व वणी शहर परिसरातील सर्व ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन पाठींबा दर्शवला आहे. याकरिता डीएव्ही इंग्रजी माध्यमिक शाळा घुग्गुस येथे स्थलांतरित न करता भालर वसाहत येथे स्थानांतरण करावे, या मागणीचे निवेदन विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या वेळी डॉ. सचिन डांभोरे, अरुण अंभोरे, संतोष जुमळे, अमित गजभिये, एस. एम. पावडे, एस. एल. डोथे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...