आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:पीओपीच्या मूर्तींची विक्री थांबवा ; माती मुर्ती कारागिरांचे कळंब तहसीलदारांना निवेदन

कळंब11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालक्यासह शहरातील मुर्ती कारागीर देवी, देवितांच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पिओपी) मुर्ती बनवून बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. या मुर्तीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषण वाढत असल्याने अशा मुर्ती बनवण्यावर शासनाने बंदी घालावी, यासाठी सोमवार, दि. १३ जून रोजी जिल्हाधिकारी, तहसीलदार, नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना मुर्ती कार कारागीर संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

जनतेच्या भावनेशी खेळून विक्रीसाठी बाजारात आणतात. मात्र, या मूर्ती नदीच्या पाण्यात, तलावामध्ये विसर्जन केल्यावर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असल्याने पाण्यात विरघळत नाही. नदी, तलाव साफसफाई करतांना अर्धवट विरघळलेल्या मुर्ती कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली टाकल्या जाते. त्यामुळे मूर्तीची विटंबना होऊन भाविकांच्या भावनेशी खेळ झाल्याचा प्रकार पहायला मिळत आहे. नागरीकांच्या भावना दुखावल्या जात आहे. तेंव्हा नागपूर, मुंबई, पुणे सारख्या महानगर पालिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंदी घातली आहे. मात्र, कळंब तालुक्यात सदर न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करून शेकडो मातीच्या मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी कळंब तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. यावेळी गणेश वाल्दे, संदीप होले, गणेश खांदारे, सचिन अंबाघरे, भुवनेश्वर खांदारे, सुरेश आमदे, विष्णू पाठक, ईश्वर मराठे, यादव खांदारे, सूरज ठाकुर, अरूण वाल्दे, आर्यन खांदारे, यश खांदारे, प्रभाकर वाल्दे, गजानन पाडवार, रामकृष्ण कपार, आदी माती मुर्ती कार उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...