आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:निवासी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांसंदर्भात मार्ड संघटनेकडून सोमवारपासून कामबंद आंदोलनास सुरूवात करण्यात आली. मागण्या मान्य होणार नाही, तो पर्यंत कामावर परत रुजू न होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांपासून निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांची पूर्तता करावी, अशी मागणी निवासी डॉक्टरांकडून केल्या जात आहे. मात्र, शासन ह्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. यात प्रामुख्याने शासकीय, पालिका महाविद्यालयात अपुरे, मोडकळीस वसतीगृह आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत आहे.

वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या नवीन जागांचा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे. सहयोगी व सहाय्यक प्राध्यापकांची अपुरी पदे तातडीने भरावी, महागाई भत्ता तात्काळ अदा करावा, निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करावी, आदी मागण्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रद्द झालेल्या आठ एमडी जनरल मेडीसीनच्या पदव्युत्तर जागा परत भरण्यात याव्या, रूग्णालय परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने एक पोलिस चौकी द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

अतिदक्षता विभाग सुरू
वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या कामबंदमुळे नियमित तपासणी करीता येणाऱ्या रुग्णांची गैरसोय झाली. मात्र, अतिदक्षता विभाग आणि अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...