आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअप्रगत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या किटा कापरा येथील पारध्यांनी शेती व्यवसायात पाय तर रोवले. परंतु, त्यांच्या उशाला असलेल्या लखीमपूर,किटा कापरा धरणातील पाण्याचा त्यांच्या शेतीसाठी वापर होत नाही. सिंचनाची इतकी मोठी उपलब्धता असतानाही पाटबंधारे विभागाकडे त्यांनी दि. १ एप्रिलला धरणातील पाण्याची मागणी केली. मात्र जुलैपासून ही प्रक्रिया राबवली जाणार असल्याने त्यांची शेतजमीन पडीत राहण्याचा धोका आहे.
शहरापासून २० किमी अंतरावरील किटा कापरा बेड्यावर ३०० पेक्षा अधिक पारधी राहतात. यातील ४० शेतकरी आहेत. वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय आताच्या पिढीनेही स्वीकारला. मात्र तेव्हापासून आजपर्यंत ते उन्हाळी हंगामात आपली शेती पडीत ठेवतात. याचे कारण त्यांच्या गावापासून लखमापूर आणि किटा कापरा धरण आहे मात्र या धरणातील पाण्याचा त्यांना शेतीसाठी उपयोग होत नाही. येथील शेतकऱ्यांना धरणाचे पाणी मिळावे, यासाठी गुरुदेव युवा संघाने पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर १ एप्रिलपासून धरणातील पाण्याचा उपसा करण्यासाठीची प्रक्रिया राबवली जाणार होती.
परंतू, आता ही प्रक्रिया १ जुलैपासून वेग घेणार असल्याने उन्हाळी हंगाम वाया जाण्याची भीती आहे. येथील शेतकरी केवळ पावसाच्या पाण्याच्या भरवशावर शेती करतात. वास्तविक पाहता दोन प्रमुख धरणे त्यांच्या गावानजीक असूनही पाण्याचा शेती उपयोग शून्य आहे. शेतकऱ्यांचा शेतीशिवाय दुसरा कुठलाच व्यवसाय नाही शेतीवरच त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची भिस्त आहे. पाटबंधारे विभागाने त्यांचे पाणी उपसा करण्याबाबतचे अर्ज स्वीकारून त्यांना धरणातील पाणी द्यावे, अशी मागणी करण्यात आली.या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी हा प्रश्न मांडून न्यायाची अपेक्षा केली. निवेदन देतेवेळी त्यांच्यासोबत किटा कापरा येथील शेतकरी प्रेम भोसले, राजू पवार गणेश कुवे यांच्यासह सुदाम पाटील उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.