आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएसटी महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिकांना प्रवास शुल्कात सवलत देण्यासाठी स्मार्ट कार्ड दिले जाते. दरम्यान, अनेक दिवसांपासून स्मार्ट कार्ड नोंद करणारे सर्व्हर डाऊन असल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांना खासगी सुविधा केंद्रावरून नोंदणी करावी लागते आहे. या नोंदणीसाठी प्रत्येकी २०० रुपये घेतले जातात.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून २९ प्रकारातील विविध सामाजिक घटकांना ३३ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत लागू करण्यात आली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांसह दिव्यांग, कर्करोग व इतर दुर्धर आजारग्रस्त, स्वातंत्र्यसैनिक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना, डॉ. आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त, साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे पुरस्कार, अधिस्वीकृतीधारक, दुर्धर आजार अशा विविध सवलत धारकांचा समावेश आहे. या सवलतीसाठी प्रवाशांना स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. डिजिटल इंडिया’ उपक्रमात हातभार लावण्यासाठी महामंडळाने २०१८-१९ मध्ये सवलत धारक प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड योजनेची घोषणा केली. ती लागू झाल्यानंतर विना कार्ड प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणतीही प्रवास सवलत देण्यात येणार नाही, असेही महामंडळाने जाहीर केले आहे. यासाठी नागरीक बसस्थानकात नोंदणीकरण्याकरीता धाव घेत आहे. मात्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.