आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनी जखमी:भरधाव वाहनाच्या धडकेत विद्यार्थिनी जखमी

यवतमाळ8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव टाटा मॅजिक वाहनाने दिलेल्या धडकेत १६ वर्षीय विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली. ही घटना शुक्रवारह सायंकाळी पंढरकवडा मार्गावरील किरण पेट्रोलपंपाजवळील सिद्धेश्वर मंदिर परिसरात घडली. संतप्त जमावाने ते वाहन जाळून रोष व्यक्त केला. जोहरा अनीस शेख (१६) रा. जफर नगर यवतमाळ असे जखमी विद्यार्थिनीचे नाव आहे.

शहरातील पांढरकवडा मार्गाने टाटा मॅजिक वाहन क्रमांक एमएच-२७-बीझेड-३४९५ ही यवतमाळ शहराकडे येत होती. किरण पेट्रोलपंपाजवळील सिद्धेश्वर मंदिर परिसरात भरधाव टाटा मॅजिक वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या विद्यार्थिनीच्या मोपेडला धडक दिली. या धडकेत विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांसह शेकडो नागरिकांनी धाव घेत विद्यार्थिनीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नंतर जमावाने वाहन जाळून टाकले.