आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयीन कोठडी:नामवंत शाळेत विद्यार्थिनीचा विनयभंग, आरोपी शिक्षकाला अटक

घाटंजी6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका नामवंत शिक्षण संस्थेच्या शाळेतील शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला. या प्रकरणाची तक्रार घाटंजी पोलिस ठाण्यात देण्यात आली. त्यावरून पोलिसांनी शिक्षक सचिन ठाकरे याच्या विरुद्ध मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास विविध गुन्हे दाखल केले. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक करून बुधवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर केले होते. दरम्यान, आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

२२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अल्पवयीन विद्यार्थ्यीनी शालेय पोषण आहारातील तांदुळ घेण्याकरता गेली होती. त्यावेळी आरोपी शिक्षक सचिन ठाकरे हे ऑफीस जवळ उभे होते. दरम्यान, त्या विद्यार्थिनीला इशारे करून रात्रीच्या सुमारास फोन करण्यास सांगितले. ह्या प्रकारानंतर अल्पवयीन विद्यार्थींनीने शाळेच्या पर्यवेक्षकांना माहिती दिली. त्यांनी आरोपी शिक्षकाला समजावून सांगणार असे म्हटले, परंतू त्यांनी काहीच केले नाही. शेवटी त्या मुलीने घर गाठून घडलेला प्रकार आईला सांगितला. शेवटी अल्पवयीन मुलीसह तिच्या आईने मंगळवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी घाटंजी पोलिस ठाणे गाठून शिक्षक सचिन ठाकरे विरोधात तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरोधात कलम ३५४ (ड), भादंवी, सह कलम १२ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...