आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावर्धा येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात रविवारी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातील प्रदर्शनकारी कला विभागातील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून मतदार जागरूकतेचा संदेश दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रकाशनस्थळावर पथनाट्य सादरीकरणाप्रसंगी मुंबई येथील मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, वर्धा येथील उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, हिंदी विश्वविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी बी. एस. मिरगे, निवडणूक कार्यालयाचे अतुल रासपायले उपस्थित होते.
पथनाट्यासाठी प्रदर्शनकारी कला विभागाचे अध्यक्ष डॉ. ओम प्रकाश भारती व डॉ. सतीश पावडे यांचे मार्गदर्शन लाभले. नाटकाचे निर्देशन व लेखन उत्कर्ष उपेंद्र सहस्रबुद्धे यांनी केले. पथनाट्यात अर्चना निगम, अभिषेक कुमार पांण्डेय, रजनीश कुमार मिश्र, उदय शंकर साह, स्वाती सैनी, सुमीत कुमार शर्मा, दीपक यादव, कपिल रत्नपाल बहादुरे, वेदिका मिश्रा, अश्विनी रोकडे यांनी सहभाग घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.