आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यासाठी संघर्ष:कोळंबी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा रस्त्यासाठी संघर्ष; पंचायत समिती सदस्य सुषमा ठाकरे यांच्याकडे मांडली विद्यार्थ्यांनी व्यथा

कुरणखेड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या आदर्श ग्रामपंचायत कोळंबी येथील प्राथमिक आरोग्य शाळेला पंचायत समिती सदस्य सुषमा प्रशांत ठाकरे यांनी अकस्मात भेट दिली. यावेळी ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणासाठीच्या संघर्षाची व्यथा त्यांच्या पुढे मांडली.

नुकतेच येथील जिल्हा परिषद शाळेला पटसंख्येच्या बाबतीत जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. ही शाळा गावापासून एक किलोमीटर पेक्षा जास्त दूर आहे. शाळेला जाण्याचा मार्ग अतिशय खराब आहे. पावसाळ्यात रस्त्यावर चिखल होत असल्याने लहान लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. येथे एकूण इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून शिक्षक तीनच आहे. त्यामुळे ७ वर्गांना शिकवताना शिक्षकांची कसरत होते. या शाळेतील शिक्षणाचा दर्जा पाहून खाजगी शाळेतून विद्यार्थी या ठिकाणी प्रवेश घेत आहेत.

प्रशासनाने लक्ष दिल्यास शाळा परिसरात आदर्श शाळा म्हणून पुढे येऊ शकते. विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकल्यानंतर त्याच्या निवारणासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन पंचायत समिती सदस्य सुषमा प्रशांत ठाकरे यांनी केले. यावेळी त्याच्या समवेत सरपंच सचिन चक्रणारायण, उपसरपंच अतुल पुंडेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष माजी सैनिक सुनील शिराळे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष, गणेश तळोकार, सतीश तळोकार, अमोल बढे, विक्की खांदेल, महेश खांदेल, पवन कुळकर्णी, श्रीकांत बढे, सरला सराटे, मुख्याध्यापक बोचरे, शिक्षिका खराटे, ताथोड यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...