आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानून संस्कृत:विद्यार्थ्यांनी आपली भाषा मानून संस्कृतचा सखोल अभ्यास करावा

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संस्कृत भाषेमध्ये वाक्यातील शब्द मागेपुढे झाले तरी अर्थ बदलत नाही. आणि अंतराळात हे शब्द मागेपुढे होण्याची शक्यता अधिक असते. अन्य भाषांमध्ये मात्र इकडचा शब्द तिकडे गेल्याबरोबर सगळा अर्थ बदलून जातो, अशी विविध वैशिष्ट्ये सांगितले. विद्यार्थ्यांनी संस्कृत ही आपली भाषा मानून तिच्या अभ्यासाकरता परिश्रम करावे, असे मत डॉ. वैशाली जोशी यांनी व्यक्त केले. येथील विशुद्ध विद्यालयव्दारा संचालित विवेकानंद विद्यालयात अभिनव पद्धतीने संस्कृत दिवस साजरा करण्यात आला.

शाळेच्या मुख्याध्यापक मीनाक्षी काळे यांच्या अध्यक्षतेत, पर्यवेक्षक स्वाती जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील संस्कृत प्राध्यापक तथा संस्कृत भारतीच्या अध्यक्ष डॉ. वैशाली जोशी होत्या. दीप प्रज्ज्वलन, प्रतिमापूजनानंतर कार्यक्रमात संगीत शिक्षक पूर्णाजी खानोदे यांच्या मार्गदर्शनात भाग्यश्री खानोदे, भक्ती मेश्राम, निशा कोम्पेलवार, श्रद्धा मेसेकर, फाल्गुनी काळे या विद्यार्थिनींनी संस्कृत गीत गायले. विशेश म्हणजे जय चव्हाण, तेजस ढोरे, आदित्य कांबळे, समीक्षा झाडे, काजल गदाई, अनुष्का मेश्राम यांनी संस्कृत श्लोकांचे पठण केले.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. वैशाली जोशी यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व, प्राचीनत्व व आधुनिक काळातही असलेले कालातीत प्रतिपादन केले. असंख्य भाषांमध्ये संस्कृतमधील मूळ शब्द आढळतात. ज्ञान, विज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये आजही संस्कृत ग्रंथांना तितकेच महत्त्व आहे जितके ऋषी मुनींच्या काळात होते. अवकाश तंत्रज्ञानात देखील संस्कृत भाषा हीच अधिक उपयुक्त मानली जाते, असे सांगितले. मुख्याध्यापक मीनाक्षी काळे यांनीही समायोजित मार्गदर्शन केले. संचालन फाल्गुनी काळे हिने तर आभार प्रदर्शन अथर्व शिंदे यांनी संस्कृत मधूनच केले. या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी केली संस्कृत नाटिका सादर
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी एक संस्कृत नाटिका सादर केली. यामध्ये दीपक सिंग, राम मिसाळ, प्रेम इंगोले, समर्थ वेळूकर, सुमित राठोड, तरुण गदाई, कावेरी सावलकर, श्वेता सरोदे, पायल भगत, खुशी बोरकर, वैष्णवी गदाई आदी विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला होता. नाटिका सादरीकरणाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी कौतूक केले.

बातम्या आणखी आहेत...