आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रॅगिंगपासून विद्यार्थ्यांनी दूरच राहावे

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रिय सेवा योजना पथक व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २९ ऑगस्ट रोजी कायदे विषयक प्रबोधन शिबिर घेण्यात आले. या प्रसंगी के. ऐ. नहार, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश यवतमाळ, रवींद्र सोनटक्के, पॅनल वकील यवतमाळ, प्राचार्य डॉ. हेमंत बारडकर, विभागप्रमुख डॉ. विजय भांबरे, प्रा. विश्वजीत बारबुद्धे, प्रा. सागर राऊत, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रवीण वानखडे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व मान्यवरांचे स्वागत करून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत बारडकर यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले रवींद्र सोनटक्के यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना अँटी रॅगिंग कायद्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच रॅगिंग म्हणजे नेमकं काय याबद्दल माहिती दिली. के. ऐ. नहार, दिवाणी न्यायाधीश यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना अँटी रॅगिंग कायदा अस्तित्वात येण्यामागची कारणे सांगितले.

रॅगिंग हा एक उच्च शैक्षणिक क्षेत्राला लागलेला शाप असून त्याच्यापासून विद्यार्थ्यांनी स्वतःला कसे दूर ठेवावे याबद्दल सविस्तर माहिती दिली. समाजात रॅगिंग मुळे होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान, कायद्यामध्ये शिक्षेची असलेली तरतूद, रॅगिंग पासून उध्वस्त झालेले कुटुंब यांचे उदाहरणासह स्पष्टीकरण दिले. त्यामुळे तुम्ही युवांनी रॅगिंग मुक्त समाज निर्माण करण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. प्रवीण वानखडे यांनी केले. तसेच, कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता रा. से. यो. स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले त्याबद्दल महाविद्यालयाचे सचिव डॉ. शीतल वातीले यांनी कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...