आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नावाने गुंज येथे अभ्यासिका व ग्रंथालयाचे उद्घाटन डॉ. गजानन फाळके यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेच्या युगामध्ये ग्रामीण भागातील होतकरू व अभ्यासू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असुन व ग्रामीण भागात सुद्धा अधिकारी घडले पाहिजे यासाठी ग्रामीण भागातील मुला-मुलींना शैक्षणिक वाव मिळावा या दृष्टिकोनातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. म्हणूनच खेडोपाडी अभ्यासिका व ग्रंथालय सुरू करण्याची गरज आहे. हाच उद्देश समोर ठेवुन ग्रामपंचायतच्या १५ वित्त आयोगाच्या निधीमधून तरतुद करून गुंज येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज अभ्यासिका व ग्रंथालय सुरू करण्यात आले.
या उद्घाटन प्रसंगी गावच्या सरपंच पुष्पा पंडित कांबळे, बबनराव जोरोळे, शरद जाधव, भालचंद्र गुंजकर, प्रमोद जाधव, सचिव आर. डी. देशमुख, योगेश तळणकर, संतोष सोळंके, गजानन सोनटक्के, स्वप्निल बलखंडे, ओमकार पैठणकर, राहुल मत्ते, महेश राठोड, सागर रोहीले, विकास गायकवाड, मनोज गुप्ता उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.