आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:पांढरकवडा नगरपालिका अंतर्गत अभ्यास दौरा, 17 शिक्षक, शिक्षिकांची निवड

पांढरकवडाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नगर परिषद अंतर्गत सर्व शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांचे महाराष्ट्रातील उत्कृष्ट शाळा म्हणून नावलौकिक असलेल्या नगर परिषद कराड अंतर्गत शाळा पाहणी व शैक्षणिक माहिती कार्यशैलीसाठी तीन दिवसीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. यासाठी एकूण १७ शिक्षक, शिक्षिका यांची निवड करण्यात आली.

१६ जुन रोजी सकाळी ७ वा न.प. मराठी शाळा १ येथून नगराध्यक्ष वैशाली अभिनय नहाते व मुख्याधिकारी राजू मोट्टेमवार यांच्या शुभहस्ते हिरवी झुंडी दाखवून प्रस्थान करण्यात आले. या अभ्यास दौऱ्याचे नेतृत्व शिक्षण विभागाचे वानखडे यांनी केले. मंगेश चांदेकर यांनी प्रवासाचे व अभ्यास दौऱ्याचे योग्य नियोजन केले. या अभ्यास दौऱ्यामुळे शाळेच्या कार्यशैली व शिक्षणाचा दर्जा नक्कीच उंचावेल अशी अपेक्षा या प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केली. पहिल्यांदाच आयोजित अभ्यास दौऱ्या बाबत शिक्षकांमध्ये उत्साह दिसून आला असून त्यांनी सर्वाचे आभार मानले आणि पालकवर्ग व सर्व स्तरातून या उपक्रमांचे स्वागत होत आहे.