आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ:त्या रेशनकार्डांचा अहवाल तात्काळ सादर करा

यवतमाळ11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठ महिन्यापासून आरसीएमएस प्रणाली बंद असतानाही तहसीलच्या पुरवठा विभागाने अंत्योदय योजनेत तब्बल ६५० रेशनकार्ड वळते केले. यांची गंभीर दखल घेत तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रभारी तहसिलदारांनी पुरवठा निरिक्षकाला दिले. याप्रकारामुळे तहसिलमध्ये एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली. आता पुरवठा विभाग काय अहवाल देणार याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे. हे वृत्त सर्वप्रथम दैनिक दिव्य मराठीने उघडकीस आणले.

गरजुंना दोन वेळचे अन्न मिळाले पाहिजे या भावनेतून शासनाच्या वतीने स्वस्त धान्य दुकानातून गरजुंना धान्य दिले जाते. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून आरसीएमएस प्रणालीत दोष असल्याचे सांगुन तहसिलच्या पुरवठा विभागाने थेट रेशन दुकानदारांसोबत डिल करून लाभार्थ्यांकडून पुरविण्यात आलेल्या प्रमाणपत्राची कोणतीही पडताळणी न करता तब्बल ६५० रेशन कार्ड अंत्योदय योजनेमध्ये टाकले आहे.

बातम्या आणखी आहेत...