आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरंभ:सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉलने शालेय क्रीडा स्पर्धांचा ओनामा ; प्रदीर्घ कालावधीनंतर क्रीडा स्पर्धा

यवतमाळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या महामारी नंतर दोन वर्षाच्या च्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेत शालेय क्रीडा स्पर्धा सुरुवात झाली. दोन वर्षानंतर झालेल्या या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळाडूंनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला १७ वर्षे वयोगट मुलींच्या गटामध्ये पुसद येथील कोषटवार दौलतखान विद्यालय या संघाने यवतमाळ पब्लिक स्कूलचा पराभव करीत विजय प्राप्त केला.

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्याल, जिल्हा जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२७ ते २९ जुलै दरम्यान सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तर १४ व १७ वर्षे वयोगट मुले व १७ वर्षे वयोगट मुली यांच्या दरम्यान ही स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या नेहरू क्रीडांगणावर टर्फ फुटबॉल मैदानावर प्रथमच घेण्यात आली. यात १४ वर्षे वयोगटात मुलांचे बारा संघ, तर सतरा वर्ष वयोगटात मुलींच्या तीन संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेच्या उद्घाटना करिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे क्रीडा अधिकारी महेश पडोळे, तालुका क्रीडा संयोजक राहुल ढोणे, तसेच प्रवीण कळसकर, किरण फुलझेले, संजय सातारकर, अविनाश भनक ,अभिजित पवार , गुणवंत सोनटक्के, प्रीतम शहाडे, श्याम तायवाडे त्याचप्रमाणे सर्व शाळांची शारीरिक शिक्षण शिक्षक व क्रीडा शिक्षक उपस्थित होते स्पर्धेमध्ये १४ वर्षे वयोगट मुलांच्या गटात महर्षी विद्या मंदिर,सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूल ,पोद्दार इंटरनॅशनल हायस्कूल ,जायंटस्इंग्लिश मीडियम स्कूल, जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूल ,सेंट अलोयसियस इंग्लिश मीडियम स्कूल,जाजू इंटरनॅशनल स्कूल,फीमेथडीस्ट इंग्लिश मीडियम स्कूल, स्कूल ऑफ स्कॉलर्स, यवतमाळ पब्लिक स्कूल, कोषटवार दौलतखान विद्यालय पुसद या संघांनी सहभाग घेतला.

तर १७ वर्षे वयोगट मुलींच्या गटात यवतमाळ पब्लिक स्कूल,सनराईस इंग्लिश मीडियम स्कूल व कोषटवार दौलतखान पुसद या संघाने सहभाग नोंदवला . स्पर्धेकरिता सर्व क्रीडा अधिकारी सर्व शाळांचे क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक तसेच फुटबॉल चे सर्व पंच खेळाडू परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...