आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघांचे यश‎:विभागीय शालेय हॉकी क्रीडा स्पर्धेत‎ बुलडाणा, यवतमाळ संघांचे यश‎

अकोला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विभागीय शालेय हॉकी क्रीडा स्पर्धेत‎ १४ वर्ष वयाेगटात मुले प्रकारात‎ सहकार विद्या मंदिर बुलडाणा‎ विजयी, तर साई विद्यालय‎ यवतमाळ उपविजेता ठरला. तसेच‎ १४ वर्ष वयाेगट मुलींमध्ये विकास‎ विद्यालय अमरावती विजयी, तर‎ मांगीलाल शर्मा अकोला उपविजेता‎ ठरले. सोबतच १७ वर्ष मुले सहकार‎ विद्या मंदिर बुलडाणा विजयी, समर्थ‎ पब्लिक स्कूल रिधोरा उपविजेता,‎ १७ वर्ष मुलींमध्ये अभ्यंकर कन्या‎ विद्यालय यवतमाळ विजेता, तर‎ मांगीलाल शर्मा विद्यालय उपविजेता‎ ठरले.‎ क्रीडा व युवक सेवा‎ संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे‎ अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व‎ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय‎ अकोला व हॉकी अकोला‎ संघटनेद्वारा विभागीय शालेय हॉकी‎ स्पर्धा २०२२-२३ चे आयोजन‎ पोलिस प्रशिक्षण केंद्र गडंकी‎ अकोला येथे केले.

मुले-मुली‎ वयोगटात सामने झाले. स्पर्धेचे‎ उद्घाटन पोलिस प्रशिक्षण संस्था‎ प्राचार्य सुनील लहिगुडे, निरीक्षक‎ बावस्कर, पो. निरीक्षक ठाकूर,‎ वरिष्ठ राज्य क्रीडा मार्गदर्शक‎ सुनील सुर्वे, जिल्हा क्रीडा‎ अधिकारी सतीशचंद्र भट, क्रीडा‎ अधिकारी मनीषा ठाकरे, अकोला‎ हॉकी असो. अध्यक्ष डॉ. अभय‎ पाटील, सचिव धीरज चव्हाण, राजू‎ उगवेकर यांची उपस्थिती होती.‎ स्पर्धेचे पंच म्हणून मयूर निंबाळकर,‎ तौफिक शेख, आशिष अढाऊ,‎ स्वप्निल अंबोरे, गौरव दांदळे,‎ शुभम अढाऊ, चेतन गायकवाड,‎ अभिनंदन ठाकूर यांनी काम पाहिले.‎ स्पर्धेकरिता अजिंक्य देवडे, निशांत‎ वानखडे, गजानन चाहसे यांनी‎ परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...