आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊस खाक:शॉर्टसर्किटमुळे दोन एकरमधील ऊस  खाक

महागाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत पावणेदोन एकरमधील ऊस जळुन खाक झाल्याने महिला शेतकऱ्याचे नुकसान झाले. ही धक्कादायक घटना महागाव तालुक्यातील कलगाव गुरूवार, दि. १० नोव्हेंबरला घडली.

महागाव तालुक्यातील कलगाव येथील महिला शेतकरी सखुबाई कापसे यांचे कलगाव शिवारात शेत आहे. त्यांनी आपल्या मालकीच्या शेतात पावणे दोन एकर क्षेत्रामध्ये ऊस लागवड केली होती.

त्यांच्या शेतातून वीज वाहक तारा गेलेल्या असुन दि. १० नोव्हेंबरला रात्री ८ ते ९ वाजताच्या दरम्यान या तारांचे घर्षण होवुन शॉर्ट सर्किट झाल्याने आगीचे गोळे पडून शेतातील उसाने पेट घेतला. या आगीने रौद्र रूप धारण केल्याने शेतातील सर्वच ऊस जळून खाक झाला आहे. यामुळे या शेतकरी महिलेचे नुकसान झाल्याची माहिती आहे. आगीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाईची मागणी नुकसान ग्रस्त शेतकरी महिलेने प्रशासनाकडे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...